पोलीस काका, दिदी उपक्रम मुलींना कोणी त्रास देत असेल किंवा पाठलाग करत असले तर डायल 112 वर माहीती देण्याबाबत तसेच तक्रार पेटीत तक्रार व नशामुक्ती बाबत मेहकर हद्दीतील सुलतानपुर येथील आर.एन.लाहोटी कॉलेज येथे मार्गदर्शन
मेहकर हद्दीतील सुलतानपुर येथील आर.एन.लाहोटी कॉलेज येथे दिनांक 14/10/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, यांचे मार्गदर्शनात श्री. संतोष खाडे SDPO मेहकर, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार ठाणेदार मेहकर यांनी पोलीस काका, दिदी उपक्रमाबद्दल माहीती दिली. मुलींना कोणी त्रास देत असेल किंवा पाठलाग करत असले तर डायल 112 वर माहीती देण्याबाबत तसेच तक्रार पेटीत तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले. मुलांनी व्यसनापासुन दुर राहुन निरोगी रहावे तसेच सोशल मिडीयाचा गैरवापर करु नये. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले.