
सायबर जनजागृती २०२५ अंतर्गत बुलढाणा पोलीस दलाच्यावतीने जिल्यातील विविध ठिकाणी पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सायबर जनजागृती कलाकारांनी नागरिकांना ऑनलाइन फसवणूक ,फेक अकाउंट ,सोशल मीडियाचा गैरवापर , अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट पासून सावध राहण्याचा संदेश दिला तसेच सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 विषयी माहिती देत तक्रार प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली.