पोलीस स्टेशन धाड येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.

सहकार विद्या मंदीर धाड येथे पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव तसेच नागरिक व महाविद्यालयीन मुला मुलींना नवीन कायद्यासंदर्भाने Adv. श्रीमती कस्तुरे, Adv. श्री सोनुने यांचे मार्गदर्शनात नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act , सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विद्यार्थ्यांची जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी व कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.