About Us
बुलढाणा पोलीस जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकरीता पोलीस नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. त्या करीता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, विविध शाखा, मुख्यालय यांचेशी समन्वय ठेवणे तसेच जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्ठांना अवगत करणे, नियंत्रण कक्ष कायदा व सुव्यस्थेचे देखभाल सुनिश्चित करते. जिल्याचे हद्दीत कोठेही काही अप्रिय/अनुचित घटना घडल्यास तात्काळ माहिती प्राप्त करून घेऊन वरिष्ठांना अवगत करणे, त्यांचे सुचनांप्रमाणे संबंधित सर्व पोलीस यंत्रणांना घटनास्थळी रवाना होणेबाबत समन्वय ठेवणे, मदतीकरीता अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने, साधनसामुग्री इ. आवश्यकतेनुसार पुरवणेकरीता समन्वय ठेवणे. घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही घेणे ही कामे नियंत्रण कक्षामार्फत अहोरात्र सुरु असतात.
पोलीस नियंत्रण कक्ष येथे नागरिकांकरिता विविध हेल्प लाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे .
जेष्ठ नागरिक व महिलांकरिता हेल्प लाईन :-जेष्ठ नागरिक व महिलाच्या मदतीकरिता दोन स्वतंत्र हेल्प लाईन क्रमांक नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . सदर सुविधा हि २४ तास उपलब्ध असून त्याकरिता ,मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे . जेष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्याने प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुसार तात्काळ मदत पुरविली जाते.
१) जेष्ठ नागरिक हेल्प लाईन क्र :- १०९०
२) महिलांकरिता हेल्प लाईन :- १०९१
३)नियंत्रण कक्ष :-०७२६२२४२४००
Telephone number:-
Email ID:-