About Us
पोलीस मुख्यालय या ठिकाणी आयुक्तालयातील राखीव पोलीस कर्मचारी विविध प्रकारच्या कर्तव्यांसाठी उपलब्ध ठेवलेले असतात. उदा .गार्ड ड्युटी, एस्कॉर्ट ड्युटी, व इतर सामान्य कर्तव्ये, मुख्यालय देखील मुलभुत पोलिस प्रशिक्षण सत्रांचे आयोजित करते. पोलीस आयुक्तालया अंतर्गत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती दरम्यान पोलीस मुख्यालयाकडुन आवश्यकतेनुसार राखीव पोलीस मनुष्यबळ पुरविण्यात येते .पोलीस मुख्यालयाचे प्रभारी या नात्याने राखीव पोलीस निरीक्षक हे पोलीस दलाची शिस्त, परेड, विविध प्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित करणे, मुख्यालयातील कॅन्टीन, भांडार , शस्त्रागार इ. कामकाज पाहणे या जबाबदाऱ्या पार पडतात.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
बुलढाणा पोलीस जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकरीता पोलीस नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. त्या करीता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, विविध शाखा, मुख्यालय यांचेशी समन्वय ठेवणे तसेच जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्ठांना अवगत करणे, नियंत्रण कक्ष कायदा व सुव्यस्थेचे देखभाल सुनिश्चित करते. जिल्याचे हद्दीत कोठेही काही अप्रिय/अनुचित घटना घडल्यास तात्काळ माहिती प्राप्त करून घेऊन वरिष्ठांना अवगत करणे, त्यांचे सुचनांप्रमाणे संबंधित सर्व पोलीस यंत्रणांना घटनास्थळी रवाना होणेबाबत समन्वय ठेवणे, मदतीकरीता अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने, साधनसामुग्री इ. आवश्यकतेनुसार पुरवणेकरीता समन्वय ठेवणे. घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही घेणे ही कामे नियंत्रण कक्षामार्फत अहोरात्र सुरु असतात.
पोलीस नियंत्रण कक्ष येथे नागरिकांकरिता विविध हेल्प लाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे .
जेष्ठ नागरिक व महिलांकरिता हेल्प लाईन :-जेष्ठ नागरिक व महिलाच्या मदतीकरिता दोन स्वतंत्र हेल्प लाईन क्रमांक नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . सदर सुविधा हि २४ तास उपलब्ध असून त्याकरिता ,मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे . जेष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्याने प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुसार तात्काळ मदत पुरविली जाते.
१) जेष्ठ नागरिक हेल्प लाईन क्र :- १०९०
२) महिलांकरिता हेल्प लाईन :- १०९१
३)नियंत्रण कक्ष :-०७२६२२४२४००
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
इंटरनेटच्या माध्यमातुन होणारे गुन्हे (उदा. संकेतस्थळ हॅक करणे, अशिल्लतेचा प्रसार करणे, ई-मेल द्वारे फसवणुक, क्रेडिट कार्ड बाबतचे गुन्हे, सॉफ्टवेअर प्रणालीबाबतचे गुन्हे, ऑनलाईन आर्थिक व्यवहारामधील फसवणुक इ.) याबाबत तपास करणेचे मुख्य काम सायबर सेल च्या माध्यमातुन करण्यात येते. सायबर सेल चे कामकाज होते.
सायबर सेल मार्फत प्रामुख्याने खालील कामे केली जातात.
१) सायबर क्राईम सेल चे उद्दिष्ट विविध प्रकारचे सायबर क्राईम रोखणे आणि शोधणे आहे.
२) बुलढाणा पोलीस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे अन्वेषणात नियमित प्रशिक्षण देणे
३) शाळा ,महाविद्यालय आणि संस्थांमध्ये सायबर क्राईम प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे .
४) बुलढाणा पोलीस स्थानिक पोलीस स्टेशनचे ,गुन्हे शाखा युनिटचे ,अन्वेषण अधिकारी व इतर शाखा यांना सायबर गुन्हे तपासाविषयी मदत व मार्गदर्शन करणे.
५) सोशल मीडियावर नजर ठेऊन आहे.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
महिला सहाय्यक पोलीस विभाग हा खास महिलांकरिता त्यांच्या तक्रारी व घरगुती हिंसाचार याबबाबतची प्रकरणे हाताळणीकरीता तयार करण्यात आला आहे. महिला सहाय्यक कक्षाचे मुख्य कार्यालयात असुन जिल्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर देखील महिला समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्या तसेच असाशकीय संस्थांच्या महिला देखील सदस्य आहेत. महिलांच्या विविध प्रकारच्या तक्ररींबाबत पिडीत महिला तसेच त्यांचे कुटुंबीय यांचे म्हणणे एकुण घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांचे मध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु समेट घडुन येत नसल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करीता संबंधीतांना पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात येते.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
बीडीडीएस युनिट बुलढाणा पोलिस दलात कार्यरत आहे. व्हीव्हीआयपी / व्हीआयपी भेटींदरम्यान, मौल्यवान / सार्वजनिक किंवा गर्दी असलेल्या ठिकाणी तोडफोडविरोधी तपासणी केली जाते. बीडीडीएसचा वापर प्रामुख्याने दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केला जातो (आयईडी बेअसर करण्यासाठी) कोणत्याही संशयास्पद पिशव्या / वस्तूंवर योग्य कारवाई केली जाते.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
सी.सी.टी.एन.एस चे उद्दिष्ट हे आहे की, कोअर ॲप्लीकेशन सॉफ्टवेअरमध्ये (सीएएस) सर्व डेटा आणि नोंदी एकत्रित करणे. जे सध्या भारतातील २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहे. या प्रकल्पात पोलिस कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, आणि नागरिकांना सेवा देण्यासाठी नागरिकांचे पोर्टल उभारणे देखील समाविष्ट आहे.
सी.सी.टी.एन.एस हे एफ.आय.आर नोंदणी, अन्वेषण आणि पोलिस ठाण्यांमध्ये चार्जशीटशी संबंधित डेटाचे डिजिटायझेशन करेल.
सी.सी.टी.एन.एस हे गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे राष्ट्रीय डेटाबेस विकसित करण्यात मदत करेल.
सर्व नवीन घटकांसह या प्रकल्पाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे मध्यवर्ती नागरिक पोर्टलला राज्यस्तरीय नागरिकांच्या पोर्टलसह दुवा साधला जाईल. ज्यामुळे अनेक नागरिकांना अनुकूल सेवा मिळतील.
सी.सी.टी.एन.एस सीएएस सॉफ्टवेअरच्या योग्य कामकाजासाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी चांगले प्रशिक्षण घेत आहेत.
पोलीस स्टेशनच्या सर्व नोंदी सी.सी.टी.एन.एस सीएएस मध्ये हरवलेली व्यक्ती, मृतदेह, अटक केलेले व्यक्ती, गुन्हेगार, उत्सव परवानग्या इत्यादी प्रमाणे सी.सी.टी.एन.एस सीएएस मध्ये पोलिस स्टेशनच्या सर्व नोंदी ऑनलाईन /ऑफलाइन प्रविष्ट केल्या जातात.
आर.बी.टी सेंटर मधील आमच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना सी.सी.टी.एन.एस कोर्स प्रशिक्षण दिले जाते.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
आर्थिक गुन्हे विभाग
आर्थिक क्षेत्रातील तसेच मालमत्तेविषयक होणारे गुन्हे याबाबत प्रतिबंध करणे, गुन्हे घडल्यास ते उघडकीस आणणे, त्यांचा सखोल तपास करणे, इ कामकाजाकरिता आर्थिक गुन्हे विभाग स्थापन करण्यात आले आहे. सदर विभागाकडून पिडीतांना त्वरित न्याय मिळणेसाठी प्रयत्न करण्यात येतात. आर्थिक गुन्हे उदा. शेअर बाजारातील व्यवहारातून होणारी फसवणूक, खाजगी वित्तीय संस्थाकडून होणारी फसवणूक, व्यक्तिशः आर्थिक व्यवहारात झालेली फसवणूक, मालमतेच्या व्यवहारात होणारी फसवणूक, इ प्रकारचे गुन्हे प्रकरणांचा तपास करणे, गुन्हे उघडकीस आणणे ह्या जबाबदाऱ्या आर्थिक गुन्हे विभाग पार पाडत असते
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
विशेष शाखा
विशेष शाखा ही पोलीस विभागाची महत्वाची शाखा आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेविषयी, बेकायदेशीर कामाविषयी, आगाऊ माहिती गोळा करण्यात विशेष शाखा कर्मचारी महत्वाची भुमिका बजावतात. व शाखा यांच्याशी समन्व्यय ठेऊन बंदोबस्त आराखडा तयार करण्याचे काम महत्वाचे काम हा विभाग करतो. तसेच राजकीय घडामोडी, विविध राजकीय संघटना, चळवळी, इ बाबत तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गोपनीय माहिती प्राप्त करणे हे देखील काम करण्यात येते.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
वाहतूक शाखा
बुलढाणा पोलीस जिल्ह्यामध्ये वाहतुक नियमन व नियंत्रण या करीता स्वतंत्र वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपूर्ण जिल्यामध्ये विविध ठिकाणी एकुण १० वाहतुक विभाग कार्यरत असुन वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत. बुलढाणा पोलीस जिल्याअंतर्गत कार्यरत असलेला वाहतुक विभाग काम करतो. धार्मिक सण, उत्सव, मिरवणूका, महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्था करण्यात येते.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
गुन्हे शाखा
बुलढाणा पोलीस जिल्ह्यामध्ये महत्वाच्या,मोठ्या व संवेदनशील गुन्हे तपास करून ,उघडकीस आणणेकरिता गुन्हे शाखा निर्माण करण्यात आली गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे गंभीर गुन्हे तपासकामात सहभागी असतात,आणि संघटित गुन्हेगारीशी लढा देण्याकरिता रणनिती तयार करत असतात. त्यास खालील उपशाखा आहेत:
१) मानवी तस्करी विरोधी कक्ष :-
हॉटेल, गेस्ट हाऊस, ब्युटी पार्लर, डान्स बार व कुंटणखाने या ठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर कारवाई करणे. तसेच कुंटणखान्यांची तपासणी करून अल्पवयीन मुलींची व जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या पीडित मुली/महिला यांची सुटका करणे.
२) गुन्हे प्रकटीकरण कक्ष :-
या शाखेमार्फत खून, खूनाचा प्रयत्न, शीब आणि खंडणी, अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, अंडरवर्ल्ड टोळी आणि संगठित गुन्हेगारी, जबरी चोरी, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्याबाबत चौकशी आणि तपासणी केली जाते. याचे कारणास्तव, उपरोक्त नमूद गुन्ह्याचे तपासकामी, तपास कामात प्राविण्य असलेल्या, समर्पित पोलिसांची टीम आवश्यक आहे.
३) अंमली पदार्थ विरोधी कक्ष
या शाखाद्वारे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ चे अंतर्गत अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गंजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारखे मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाची निर्मिती / वाहतूक / बाळगणे / विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.
या शाखेची मुख्य जबाबदारी शहरातील अंमली पदार्थाचे निर्मिती आणि पुरवठावर नियंत्रण ठेवणे असून, जनजागृती कार्यक्रमाद्वारे मागणी कमी करणे ही आहे.
4) सायबर गुन्हे
ही शाखा वेबसाइट हॅकिंग, सायबर स्कॉकिंग, सायबर पोर्नोग्राफी ( बीभत्स साहित्य ), ई-मेल, क्रेडिट कार्ड गुन्हा, सॉफ्टवेअर चोरी, ऑनलाइन फसवणूक आणि इंटरनेट गुन्हा तपासणीशी संबंधित असून भा.द.वि. आणि इतर कायद्यांसह, विशेषत: माहिती तंत्रज्ञान कायदा (दुरुस्ती) २००८ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रकरणांशी तपास करतात.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
पासपोर्ट विभागाकडील माहिती
१. भारतीय पासपोर्ट मिळणेसाठी अर्जदाराने पासपोर्ट सेवा केंद्र (passportindia.gov.in) येथे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदरचा अर्ज प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आर.पी.ओ.) कडून पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संबंधीत पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन पाठविला जातो.आणि स्थानिक पोलिस ठाण्याकडुन पडताळणी करून अहवाल अंतिम पडताळणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालय येथे पाठवला जातो. येथुनच अर्जाबाबतचा अहवाल प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय येथे ऑनलाइन पाठविला जातो. व त्या (आर.पी.ओ.) कार्यालया मार्फत अर्जदारांना पारपत्र दिले जाते.
२.अर्जदाराने पासपोर्ट सेवा केंद्र( passportindia.gov.in ) येथे ऑनलाईन पी.सी.सी (Police Clearance Certificate) मिळणेकामी केलेल्या अर्जाची वरील प्रमाणे पडताळणी करून अहवाल प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय येथे ऑनलाइन पाठविला जातो. व त्या कार्यालया मार्फत अर्जदारांना पी.सी.सी दिले जाते.
३.परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी तेथील भारतीय दूतावास येथे नोरी (NORI-NO OBLIGATION RETURN TO INDIA ) प्रमाणपत्र मिळणेकामी सादर केलेला ऑनलाईन अर्ज मा. गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन यांचे मार्फतीने इकडील पोलीस आयुक्त कार्यालयास प्राप्त होऊन अर्जाची वरील प्रमाणे पडताळणी करून सदरचा अहवाल मा. गृहमंत्रालय,महाराष्ट्र शासन यांना ऑफलाईन पद्धतीने पाठविला जातो. व तेथुनच सबंधित दुतावासास ऑनलाईन पद्धतीने पाठविला जातो.
चारित्र्य पडताळणी विभाग
या विभागामार्फत शासकीय प्रकरणे (ऑफलाईन पडताळणी केली जाते ) वगळता खालील बाबींकरीता ( pcs.mahaonline.gov.in) या वेबसाइट वरून ऑनलाईन सादर केलेल्या अर्जावर पडताळणी करून ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाते.
१) शासकीय प्रकरणे (ऑफलाईन पद्धतीने )
२) निम-शासकीय प्रकरणे (बँका ,निगम ,लि .कंपन्या शासनपुरस्कृत ,निमशासकीय संस्था ) इत्यादींतील कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी केली जाते.
३) सिक्युरिटी गार्ड
४) खाजगी कंपनीतील कर्मचारी /अधिकारी
५) शासनातर्फे किंवा शासनपुरस्कृत संस्था यांचेकडून दिला जाणारा पुरस्कार विजेते व्यक्तींची तपासणी.
६) अवयव प्रत्यारोपनांसाठीचे व्यक्तींची पडताळणी
७) नागरिक डिजिटल सुविधा,अल्पबचत एजन्ट / व्यासायिक इत्यादी ,
८) परदेशास जाणाऱ्या व्यक्तींना / नागरिकांना त्यांनी ( pcs.mahaonline.gov.in वरील Police Clearance Certificate-Abroad ) वेबसाईट
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
पोलीससांसाठी कल्याणकारी योजना राबवीने
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
बुलढाणा पोलीस जिल्यामधील पोलीस मोटार परिवहन विभाग कार्यरत असुन सदर विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस दलात दैनंदिन कामकाज,गस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त या करीता वाहनांची आवश्यकता असते. सर्व वरिष्ठ अधिकारीं, पोलीस स्टेशन, विविध शाखा, वाहतूक विभाग इ. यांना मोटार परिवहन विभागाकडुन वाहने पुरविली जातात. तसेच वाहन चालकांची नियुक्ती करण्यात येते. आवश्यकतेनुसार पोलीस दलास वाहने पुरविणे, वाहनांचे मेंटेनन्स व दुरुस्ती करणे इ. कामे ह्या विभागामार्फत होतात.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
बिनतारी संदेश विभाग
पोलीस बिनतारी संदेश विभाग ही पोलिसांची तांत्रिक शाखा आहे. वायरलेस विभागाकडून अखंडीतपणे २४ तास बिनतारी दळणवळण पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कायदा व सुव्यस्था राखणेकरीता पुरविले जाते. पोलीस दलाच्या अन्य तांत्रिक गरजांकरीता पोलीस बिनतारी संदेश विभागाची मदत घेतली जाते, तसेच तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या अन्य विभागांशी ,संस्थांशी बिनतारी संदेश विभागामार्फत समन्वय ठेऊन पोलीस दलाकरिता अखंडित व सुरळीत तांत्रिक सेवा उपलब्धतेसाठी समन्व्यय ठेवला जातो.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमे अंतर्गत गावे तंटामुक्त करणे
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
गुन्हे सांख्येकी माहीती तयार करणे विधानसभा तारांकीत प्रश्न उ-तर तयार करणे
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
गुन्हयाच्या घटनास्थळांना भेटी देवुन श्वानांच्या मदतीने गुन्हे उघडकीस आनण्यात मदत करणे
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
गुन्हयाच्या घटनास्थळांना भेटी देवुन बोटांचे ठसे डेव्हलप करने व ठशांचा शोध डाटाबेस मध्ये घेवुन गुन्हे उघडकीस आनण्यात मदत करणे
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
दोषसिद्धी विभाग
न्यायालयात दाखलगुन्हयामध्ये दोश सिद्धी चे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. गुन्हयांचा निकाल लागल्यानंतर त्याची आकडेवारी ठेवणे.
Officers Portfolio
About Us
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
सुरक्षा शाखा
आपत्ती व्यवस्थापन , धर्म स्थळांची पाहणी करणे.
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
About Us
गुन्हे सांख्येकी माहीती तयार करणे विधानसभा तारांकीत प्रश्न उ-तर तयार करणे
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
सोशल मिडिया लॅब
सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅबची स्थापना करण्यात आली आहे. सोशल मीडिया हाताळणी आणि देखरेख हे त्यांचे दोन भाग आहेत.
Officers Portfolio
About Us
सोशल मिडिया लॅब
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,
तांत्रीक विश्लेशन विभाग
बुलढाणा जिल्हयातील दाखल गुन्हयांमध्ये तांत्रीक सहाय्य करण्यासाठी सदर कक्षाची स्थापणा करण्यात आलेली आहे.
Officers Portfolio
About Us
तांत्रीक विष्लेशण विभाग
Telephone number:- 07262242327 , 07264242067 , 07268266240 ,
Email ID:- ps.dhamngaonbade.buld@mahapolice.gov.in ,