बातम्या
पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे Ak नॅशनल शाळा येथील विद्यार्थी यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज व सायबर सुरक्षा व महीला व बालकांचे सरंक्षण बाबत तसेच शस्र बाबत माहिती देण्यात आली

मा. मुख्यमंत्री म.रा. मुंबई यांचे 100 दिवस कार्यक्रम अनुषंगाने Ak नॅशनल शाळा येथील विद्यार्थी विदयार्थीनीनां पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे बोलावून त्यांना पोलीस स्टेशन चे दैनंदिन कामकाज, गुन्हयाचा होणारा तपास, सायबर गुन्हे व महीलांचे/ बालकांचे सुरक्षा अनुषंगाने मार्गदर्शन तसेच शस्र बाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यकमामध्ये पोलीस निरीक्षक श्री. पवार व पोलीस स्टेशन खामगाव शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मार्गदर्शन केले.